तिरुअनंतपुरम : केरळमधील तिरुवनंतपुरममध्ये एका 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. अखेर पोलिसांनी त्याच्या हत्येचे गूढ उकलले आहे.
शेरोन राज या रेडिओलॉजीच्या विद्यार्थ्याची त्याच्या गर्लफ्रेंड गरिश्माने हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. तिने 14 ऑक्टोबर रोजी शेरॉनला घरी बोलावले.
गरिश्माने ज्यूसमध्ये कीटकनाशक टाकून शेरॉनला प्यायला दिले. ते प्यायल्यानंतर 11 दिवसानंतर उपचारा दरम्यान शेरॉनचा मृत्यू झाला.
गरिश्माचे घर सोडल्यानंतर शेरॉनने स्वतःचे घर गाठले. त्याची प्रकृती बिघडली. शेरॉन गरिश्माच्या घरी गेल्याची कल्पना त्याच्या भावाला होती.
त्याने गरिष्माला हाक मारली. शेरॉनच्या भावाने गरिश्माला विचारले की तिने काही खायला किंवा प्यायला दिले आहे का? गरिश्माने नकारार्थी उत्तर दिले.
गरिश्माच्या घरातून आलेला शेरॉन बेशुद्ध पडला. त्यांच्या कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र 11 दिवसांनी 25 ऑक्टोबरला त्याचा मृत्यू झाला. वैद्यकीय अहवालात शेरॉनचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचे स्पष्ट झाले.
याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला. गरिश्माची चौकशी करण्यात आली. तिने दिलेल्या माहितीवरून पोलिसांना संशय आला. सुरुवातीला तिने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र 30 ऑक्टोबर रोजी तिने गुन्ह्याची कबुली दिली.
गरिश्माचे शेरॉनसोबत वर्षभरापासून अफेअर होते. दरम्यान, गरिश्माचे दुसऱ्या तरुणाशी लग्न झाले. यानंतरही दोघांमधील संबंध कायम राहिले.
लग्नाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली तसतशी गरिश्माने शेरॉनसोबत ब्रेकअप करण्याचा विषय काढला. तेव्हा त्याने नकार दिला. गरिश्माने वारंवार समजावले पण शेरॉन ऐकायला तयार नव्हता.
गरिष्माने शेरॉनसोबतचे नाते संपवण्यासाठी अनेक बहाणे केले. माझ्या कुंडलीत दोष आहे. गुरुजींनी तिला सांगितले की तिचा पहिला नवरा लवकरच मरणार आहे म्हणून तिने थाप मारून त्याला रोखण्याचा प्रयत्न केला पण शेरॉन ऐकत नव्हता.
त्यामुळे गरिष्माने शेरॉनचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. तिने त्याला घरी बोलावले आणि ज्यूसमध्ये कीटकनाशक टाकून शेरॉनला प्यायला दिले. यानंतर शेरॉनची प्रकृती बिघडली, 11 दिवसानंतर त्याचा मृत्यू झाला.