प्रेयसीची लाॅजवर नेऊन गळा चिरून निर्घृण हत्या; पुण्यातील धक्कादायक घटना

0
16
Crime News

पुणे : प्रियकरासोबत लाॅजवर गेलेल्या प्रेयसीचा तीक्ष्ण शस्त्राने गळा चिरून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पुण्यातील स्वारगेट-सातारा रस्त्यावरील शितल लाॅजवर ही घटना घडली आहे. सकाळी रूमची साफसफाई करण्यास आलेल्या कामगाराने रूमची पाहणी केली असता त्याला बाथरूममध्ये तरूणीचा रक्ताचा थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसून आला.

दिप्ती काटमोडे (वय २४) असं खून झालेल्या तरूणीचं नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरूणी व तिचा प्रियकर दोघे रात्री लाॅजवर आले होते. आज सकाळी नेहमीप्रमाणे रूमची साफसफाई करण्यासाठी लाॅजचा कामगार रूममध्ये आला.

तेव्हा त्याला बाथरूममध्ये तरूणीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसून आला. त्यानंतर त्याने ही माहिती पोलिसांना दिली.

माहिती मिळताच भारती विद्यापीठ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तिचा गळा चिरून खून केल्याचं समोर आलं आहे.

माहिती घेतल्यानंचर दिप्ती तिच्या मित्रासोबत लाॅजवर रात्री आली असल्याचे समजले. पोलिसांकडून पसार झालेल्या त्या मित्राचा शोध घेतला जात आहे.