Bollywood Box Office Live : अजय देवगणचा ‘रनवे 34’ आणि टायगर श्रॉफचा ‘हिरोपंती 2’ बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकले नाहीत. KGF Chapter 2 पाहण्यासाठी लोक अजूनही सिनेमागृहांमध्ये गर्दी करत आहेत. ‘हिरोपंती 2’ ने वीकेंडच्या शेवटच्या दिवशी म्हणजे रविवारी फक्त 1 कोटींची कमाई केली.
याउलट, ‘रनवे 34’ ने थोडी चांगली कामगिरी केली आणि 2.5 कोटी कमावले. दुसरीकडे, ‘KGF 2’ ने या दोन चित्रपटांचे कलेक्शन एकत्र करून आणखी कमाई केली आणि बॉक्स ऑफिसवर 4 कोटींचा व्यवसाय केला.
बॉलीवूड आणि छोट्या पडद्यावरील स्टार्स आज त्यांच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देत आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सलमान खानने त्याच्या कुटुंबीयांसाठी आणि मित्रांसाठी पार्टी आयोजित केली आहे. तर तिकडे सुपरस्टार अक्षय कुमारने एक व्हिडिओ शेअर करत पीएम मोदींचे कौतुक केले आहे.