Bogus Drug Racket : देशभरात औषध माफियांचं रॅकेट, औषध विकत घेताना काय काळजी घ्या !

Bogus Drug Racket: Drug mafia racket across the country, what to look out for when buying drugs!

Bogus Drug Racket: : आपण कुठल्या ना कुठल्या आजारामुळे सगळेच बाजारातून औषधी घेत असतो. मात्र, बाजारात बोगस औषधे वाढत आहेत.

कोरोनाच्या काळात सर्व व्यवसाय मंदीत होते. फक्त औषधी व्यवसाय तेजीत होता. याचा फायदा घेत औषध माफियांनी बनावट औषधे बनवून विकण्याचा डाव सुरू केला.

सध्या देशातील ४७ टक्के औषधे बोगस असल्याचे एएसपीए या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. एएसपीएचा अहवाल काय म्हणतो ते पाहूया.

तुमचे औषध बोगस आहे का? 

अहवालानुसार, 2021 मध्ये बनावट औषधांमध्ये 47% वाढ झाली. यामध्ये लस, सॅनिटायझर्स, प्रतिजैविकांचा समावेश आहे. अहवालानुसार, 23 राज्यांमध्ये बनावट औषधे सापडली असून ब्रँडेड औषधांच्या नावावर बनावट औषधे आहेत.

ही औषधे आरोग्यासाठी हानिकारक आहेत. ही औषधे रोग बरा होण्याऐवजी रुग्णाचा जीव घेऊ शकतात. त्यामुळे औषधे घेताना काळजी घेणे आवश्यक आहे.

औषध घेताना काय काळजी घ्यावी?

संपूर्ण पॅकेजिंगसह औषधे खरेदी करा, ज्ञात माहितीची ब्रँडेड औषधे खरेदी करा, औषधाच्या नावाचा रंग, फॉन्ट, अक्षरे तपासा, कंपनीचा लोगो, ट्रेडमार्क, होलोग्राम तपासा. बारकोड किंवा क्यूआर कोड स्कॅन करून शोधून काढण्याचा आग्रह डॉक्टरांनी केला आहे.

पैशासाठी माफिया काय करतील याचा नेम नाही. आता त्यांनी थेट औषधांचा काळाबाजार सुरू केला आहे. लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या या लोकांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा या खोट्या खेळात शेकडो निरपराधांचे बळी जातील.