अहमदाबाद : गुजरातमध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. 500 लोक नदीत पडले आहेत. गुजरातमधील मोरबी येथे ही मोठी दुर्घटना घडली आहे.
मोरबी येथील माचू नदीवरील केबल पूल अचानक कोसळला आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात जवळपास 500 जीव धोक्यात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
या पुलावर 500 लोक असल्याची माहिती मिळाली. देशभरात सध्या छटपूजा जोरात सुरू आहे. छट पूजेनिमित्त या पुलावर मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
या वर्दळीच्या आणि पवित्र वातावरणात घडलेल्या या घटनेमुळे आनंदावर विरजण पडले आहे. पूल कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस, बचाव पथक, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
PM @narendramodi has announced an ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF for the next of kin of each of those who lost their lives in the mishap in Morbi. The injured would be given Rs. 50,000.
— PMO India (@PMOIndia) October 30, 2022
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलावर 500 लोक होते. मात्र पूल कोसळल्याने किती लोक नदीत वाहून गेले याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.या घटनेमुळे मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
नदीत वाहून गेलेल्या नागरिकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. नदीत अडकलेल्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.