Big Announcement from Makers of Goodbye | अमिताभ बच्चन यांचा आगामी फॅमिली ड्रामा चित्रपट ‘गुडबाय’च्या निर्मात्यांनी तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
निर्मात्यांनी सोमवारी जाहीर केले की चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशी तिकीटाची किंमत 150 रुपये असेल. हा चित्रपट या शुक्रवारी म्हणजेच ७ ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
तिकीट 150 रुपयांना मिळेल
सोमवारी बालाजी मोशन पिक्चर्सने एक व्हिडिओ शेअर करून याची घोषणा केली. व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन म्हणतात, आमचा चित्रपट गुडबाय 7 ऑक्टोबर रोजी तुमच्या जवळच्या सिनेमागृहात येत आहे.
आम्ही ठरवले आहे की 7 ऑक्टोबरला गुडबाय तिकिटे खास असतील. या दिवशी तिकीट 150 रुपयांमध्ये उपलब्ध असतील. त्यामुळे, कृपया तुमच्या कुटुंबासमवेत शेअर करा. जवळच्या चित्रपटगृहात आमच्यासोबत चित्रपट पहा. तिथे भेटू.
विकास बहल यांचे दिग्दर्शन
विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ बच्चन व्यतिरिक्त नीना गुप्ता आणि रश्मिका मंदान्ना यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट एक उत्तम फॅमिली ड्रामा चित्रपट आहे.
हा चित्रपट दुःख, प्रेम आणि स्वत:चा शोध यांचं उत्तम मिश्रण आहे. या चित्रपटात पावेल गुलाटी, एली अवराम, सुनील ग्रोव्हर, साहिल मेहता आणि अभिषेक खन्ना यांच्याही भूमिका आहेत.