औरंगाबाद : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत.
यावर प्रतिक्रिया देताना संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी संतोष शिंदे म्हणाले की, कोश्यारी यांचे वक्तव्य महाराष्ट्रद्रोही आणि शिवद्रोही आहेत.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि वाद हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी वेळोवेळी काही विधाने करतात आणि त्यामुळे वाद निर्माण होतात.
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि भाजप नेते नितीन गडकरी यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते डिलीट ही पदवी देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची थेट तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी केली.
आम्ही शाळेत शिकत होतो तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे, तुमचा आवडता नेता कोण आहे? ज्यांना जो नेता आवडला त्याची नाव घेत होती. सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू आवडले त्यांनी त्यांची नावे घेतली.
मला वाटतं आता तुम्हाला कोणी विचारलं की तुमचा आयकॉन कोण आहे? तुमचा आवडता नेता कोण आहे? त्यामुळे तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही. तुमची भेट महाराष्ट्रातच होईल.
शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श आहेत. तर आधुनिक काळाबद्दल बोलत आहे. आपण ते येथे मिळवू शकता. डॉ. आंबेडकरांपासून ते नितीन गडकरीपर्यंत तुम्ही सगळे इथेच भेटतील, असे वादग्रस्त विधान केले आहे.
भगतसिंह कोश्यारी यांच्या या विधानाचे पडसाद उमटत आहेत. राज्यपालही महाराष्ट्र द्रोही आणि छत्रपती शिवाजी महाराज द्रोही आहेत.
राज्यपाल महोदय छत्रपती शिवाजी महाराज साडेतीनशे वर्षांनंतरही महाराष्ट्राच्या आणि देशातील प्रत्येक माणसाच्या नसानसात आहेत.
आज महाराष्ट्राच्या डोळ्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श उभा आहे. एकदा गडकिल्ल्याला भेट दिली तर कळेल, असे संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी म्हटले आहे.