पीएम मोदींना मारण्यासाठी तयार रहा: काँग्रेसचे राजा पात्रिया यांचे वादग्रस्त विधान

Be ready to kill PM Modi: Raja Patria's controversial statement

काँग्रेसचे माजी मंत्री राजा पात्रिया यांचे वादग्रस्त विधान समोर आले आहे. यामध्ये त्यांनी ‘पीएम मोदींना मारायला तयार रहा’ अशी चिथावणीखोर भाषा वापरताना दिसत आहेत.

मात्र, नंतर पात्रिया यांनी सारवासारव करीत आपले वक्तव्य मागे घेतले. ‘आज तक’शी बोलताना ते म्हणाले की, पुढच्या निवडणुकीत मोदींचा पराभव करायचा आहे. एवढेच नाही तर ते बोलण्याच्या ओघात घडल्याचे ते म्हणाले. हा व्हिडिओ शेअर करत भाजप नेत्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

समोर आलेल्या राजा पत्रियाच्या कथित व्हिडिओमध्ये ते काही कामगारांना संबोधित करत आहेत. मोदी निवडणुका संपवतील, मोदी धर्म, जात, भाषेच्या आधारावर फूट पाडतील.

 

दलित, आदिवासी, अल्पसंख्याकांचे जीव धोक्यात आणतील. संविधान वाचवायचे असेल तर मोदींना मारायला तयार राहा, असे ते म्हणताना दिसत आहेत. तथापि, नंतर त्यांनी म्हटले कि ‘हत्या’ म्हणजे ‘पराभव’ करा असा अर्थ अपेक्षित होता, मात्र बोलताना ओघात तसे बोलून गेलो.

निवडणूक हरवायची होती – राजा

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजा पत्रिया यांनी आज तकला सांगितले की पुढील निवडणुकीत भाजपला हरवायचे आहे. ते म्हणाले, बोलण्याच्या ओघात घडले. हा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीनेच हा भाग उचलला आणि विधान वादग्रस्त असल्याचे भासवले.

राजा म्हणाले की, हा व्हिडिओ एडिट करण्यात आला आहे. पूर्ण भाषणात पाहीले तर मला असे म्हणायचे नव्हते. माझ्या विधानाचा विपर्यास करून मांडण्यात आला.

ही महात्मा गांधींची काँग्रेस नाही : नरोत्तम मिश्रा

काँग्रेसचे माजी मंत्री राजा पात्रिया यांच्या वक्तव्यावर गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, मी पात्रिया जी यांचे वक्तव्य ऐकले, हे स्पष्ट झाले की ही महात्मा गांधींची काँग्रेस नाही.

ते म्हणाले की, इटली काँग्रेस आहे आणि इटलीमध्ये मुसोलिनीची मानसिकता आहे. स्वरा भास्कर, कन्हैया कुमार, सुशांत हे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतील प्रवासात सोबत चालले आहेत. ते म्हणाले की, मी एसपींना याप्रकरणी तत्काळ एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.