लातूर : प्रत्येक घरात, कार्यालयात अलीकडे शुद्ध पाणी पिण्याच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या पाण्याच्या कॅनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ऑफिस, दुकान किंवा कोणत्याही हॉटेलसारख्या अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी हे डबे असतात.
विशेषत: हे पाणी शुद्ध आहे असे आपण सहज गृहीत धरतो, पण ते खरेच शुद्ध आहे की स्वच्छ असते का? या प्रश्नाचे उत्तर देणारा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
" पानी जिहाद " pic.twitter.com/LHBbpdPpOB
— Naveen Kr Jindal 🇮🇳 (@naveenjindalbjp) November 7, 2022
हा व्हिडिओ पाहिल्यास जारचे पाणी पिणे बंद होईल. हो हे खरे आहे. कारण या व्हिडिओमध्ये पाण्याच्या डब्याशी संबंधित एक धक्कादायक घटना समोर आली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका ठिकाणी हे पाणी नळाच्या पाण्याने धुतले जात आहे.
व्हिडिओमध्ये एक माणूस पाण्याच्या पाईपने पाण्याचा कॅन धुताना दिसत आहे, पण तो पुढे काय करतो तुम्हालाही धक्का बसेल. पुढे, ती व्यक्ती पाण्याच्या कॅनमध्ये थुंकते. हा घृणास्पद व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
भाजपचे नवीन कुमार जिंदाल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला असून त्याला ‘वॉटर जिहाद’ असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओवर नेटिझन्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.