अभिनेत्री सुष्मिता सेनची ललित मोदी सोबत लग्नाची चर्चा, सोशल मिडीयावर ट्रेंड

Actress Sushmita Sen marriage talk with Lalit Modi trending on social media

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन आयपीएलचे संस्थापक ललित मोदीला डेट करत असल्याची बातमी समोर आली आहे. ललित मोदी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर सुष्मिता सेनसोबतचा एक फोटो शेअर करून वादाला तोंड फोडले आहे.

फरार उद्योगपती ललितने सुष्मिताला आपला ‘बेटर हाफ’  म्हणून संबोधले तेव्हा सर्वांच्या भुवया उंचावल्या. त्यामुळे वयाच्या 46 व्या वर्षी सुष्मिताने अखेर लग्नगाठ बांधल्याचे बोलले जात होते.

शेवटी ललितने स्पष्ट केले की, आम्ही फक्त रिलेशनशिपमध्ये आहोत, पण एक दिवस आम्ही नक्कीच लग्नाच्या बंधनात अडकू.

Image

सुष्मिता सेन काही महिन्यांपूर्वी रोहमन शॉलला डेट करत होती. 15 वर्षांनंतर तरुण रोहमनसोबतचे तिचे नाते काही दिवसांपूर्वीच संपुष्टात आले.

त्यानंतर अनेक माध्यमांनी सुष्मिताने ललित मोदीसोबत लग्न केल्याचे वृत्त दिले होते. विशेषत: सुष्मिताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून लग्नाची बातमी शेअर न केल्याने शंका उपस्थित होऊ लागल्या.

सोशल मीडियावर ललित मोदींची माहिती

मालदीवच्या सहलीनंतर कुटुंबासह लंडनला परतलो, मी माझ्या चांगल्या अर्ध्या सुष्मिता सेनचा उल्लेख कसा टाळू शकतो. एक नवीन सुरुवात, नवीन जीवन, अपार आनंद असे ट्विट करताना, ललितने अनेक प्रेमळ इमोजी देखील जोडल्या आहेत.

ललित मोदीची सोशल मीडियावरुन माहिती

फक्त स्पष्टपणे सांगायचे तर, अजून लग्न झालेले नाही – फक्त एकमेकांना डेट करत आहे. पण तेही (लग्न) एक दिवस होणारच, असे ललित मोदींनी लग्नाची चर्चा जोरात सुरू असताना स्पष्ट केले.

कोण आहे सुष्मिता सेन?

सुष्मिता सेनने 1994 मध्ये वयाच्या 18 व्या वर्षी फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला होता. ती 1994 च्या मिस युनिव्हर्स स्पर्धेची विजेती होती.

मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकणारी ती पहिली भारतीय मुलगी ठरली. त्यामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

Image

तिने 1996 मध्ये दस्तक या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सुष्मिताने जवळपास 35 चित्रपटांमध्ये काम केले आहे. बीवी नंबर वन, फिजा, नायक, आँखे, पख्त, मै हू ना असे असंख्य चित्रपट हिट झाले.

तिला फिल्मफेअर, स्टार स्क्रीन, आयफा यांसारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सेन यांनी दोन मुली दत्तक घेतल्या आहेत. सेन त्यांची पूर्ण काळजी घेतात.