दिंडी चालली..
**********
दिंडी चालली चालली
विठ्ठलाचे दर्शनी
पाहे वाट भक्तांची
तिथे चक्रपाणी..!
तुळशी हार गळा
कंठी वैजयंती माळा
भाळी कस्तुरी तिलक
उटी ही चंदनी..!
कासे पितांबर
कानी कुंडले मकर
मस्तकी किरीट
दिसे शोभूनी..!
अबीर गुलाल
करी पुष्प कमल
श्रीरंग भक्तांसवें
रंगतो भजनी..!
चंद्रभागा तटी
झाली वैष्णवांची दाटी
नाचे किर्तनीं हरी
भान हरपूनी..!
ज्योती जयंतराव आळंदकर
लातूर