विवाहित मुस्लीम प्रियकराला हिंदू प्रेयसीने जाब विचारला, तरुणाने शिरच्छेद केला आणि प्रेत नाल्यात टाकले

0
38
विवाहित मुस्लीम प्रियकराला हिंदू प्रेयसीने जाब विचारला, तरुणाने शिरच्छेद केला आणि प्रेत नाल्यात टाकले

मुंबई : श्रद्धा वॉकर हत्या प्रकरणात एकीकडे नवनवीन गोष्टी समोर येत असतानाच या प्रकरणासारख्या घटनाही समोर येत आहेत. बांगलादेशमध्ये एका हिंदू मुलीची तिच्या मुस्लिम प्रियकराने हत्या केली.

आपला प्रियकर विवाहित असल्याचे समजल्यावर तिने त्याच्याकडे विचारपूस केली असता, त्याने प्रेयसीचा चक्क शिरच्छेद केल्याचा आरोप आहे. अबू बकर असे आरोपी विवाहित प्रियकराचे नाव आहे.

बांगलादेशातील खुलना जिल्ह्यातील सोंडांगा भागात 7 नोव्हेंबर रोजी ही घटना घडल्याचे वृत्त आहे. अबू बकरवर कविता राणी नावाच्या हिंदू प्रेयसीची हत्या केल्याचा आरोप आहे. अबूला जलद कृती दलाने अटक केली.

अबू आणि कविता यांचे एकमेकांवर प्रेम आहे. पण एके दिवशी कविताला कळले की अबू आधीच विवाहित आहे. तेव्हा संतापलेल्या कविताने अबूला याबाबत विचारले.

त्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर अबूने तिचा शिरच्छेद करून तिचा जीव घेतल्याचा दावा केला जात आहे. व्हॉईस ऑफ बांगलादेश हिंदूने याबाबत माहिती दिली आहे.

अबूने कविताच्या शरीराचे तीन तुकडे केल्याचा आरोप आहे. त्याने तिचे डोके, हात आणि शरीराचे इतर भाग वेगवेगळ्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गुंडाळले आणि नाल्यात टाकून दिले.

दिल्लीतील श्रद्धा वॉकर हत्याकांडाशी साधर्म्य 

हा गुन्हा सध्या दिल्लीत झालेल्या श्रद्धा वॉकर हत्याकांड सारखाच मानला जात आहे. 28 वर्षीय आफताब अमीन पूनावाला याने त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वॉकरची हत्या केली आणि दिल्लीतील छत्तरपूर आणि मेहरौलीच्या जंगलात तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले.