World Consumer Rights Day : ‘फेअर डिजिटल फायनान्स’ ही यावेळची थीम, ई-कॉमर्स कंपन्यांवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल, सरकारने सांगितले !

World Consumer Rights Day: 'Fair Digital Finance' is theme of this time, e-commerce companies will be closely monitored government said!

World Consumer Rights Day : जागतिक ग्राहक हक्क दिन 2022 हा ग्राहक संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी दरवर्षी 15 मार्च रोजी साजरा केला जातो.

ग्राहकांच्या प्रत्येक सेवेच्या हक्काचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. यावेळची थीम ‘फेअर डिजिटल फायनान्स’ आहे.

दरम्यान, ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग म्हणतात की, डिजिटल सेवेमुळे सुविधा वाढल्या आहेत पण काही समस्याही निर्माण होतात.

ई-फायलिंगद्वारे घरी बसून तुमची समस्या नोंदवा

सचिव रोहित कुमार सिंग यांनी जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त पुढे सांगितले की, ‘ते अधिक प्रभावी करण्यासाठी, ग्राहक मंत्रालयाला सर्व सेवांमध्ये समाविष्ट केले पाहिजे. याशिवाय तुम्ही घरबसल्या तुमच्या समस्या ई-फायलिंगद्वारे नोंदवू शकता.

Cryptocurrency News Today : क्रिप्टोकरन्सीमध्ये घसरण सुरूच, परंतु एका टोकनमध्ये 1300% झेप

त्याचबरोबर ते पुढे म्हणाले की, ‘ई-कॉमर्सचा असाच विकास होत राहिला तर त्याची मक्तेदारी होईल. ते टाळून सर्वांना संधी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच, ग्राहकाला पर्याय असला पाहिजे म्हणजे अल्गोरिदमिक स्वातंत्र्य देखील असायला हवे.

ई-कॉमर्स कंपन्यांनी जबाबदार व्हावे- राज्यमंत्री

राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनीही ग्राहक हक्क दिनी ग्राहक व्यवहारावर आपले मत मांडले आहे. ते म्हणाले की, ‘ई-कॉमर्स कंपन्यांना जबाबदार बनवण्यासाठी नियम बनवले पाहिजेत. तसेच सरकारकडूनही काही बदल केले जात आहेत, जेणेकरुन ग्राहकांचे हित जपण्यास प्राधान्य दिले जावे.

आरबीआय कोणतीही क्रिप्टोकरन्सी आणणार नाही; केंद्र सरकारने संसदेत स्पष्ट केले

यासाठी अनेक कंपन्यांना नियमभंगाच्या नोटिसा पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. चुकीच्या व्यवहाराबद्दल आतापर्यंत सुमारे 59 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर डिजिटल सेवा अधिक पारदर्शक, जलद आणि सर्वांसाठी फायदेशीर तसेच सुरक्षित बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

RECENT POSTS