पत्नीचे विवाहबाह्य संबंध पतीला समजल्यानंतर प्रकरण गेले पंचायतीत; महिलेने घेतले स्वत:ला पेटवून

0
39
Patna News: Cousin along with grandfather raped minor, made video viral

औरंगाबाद (बिहार): प्रियकरामुळे विवाहितेने स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आग लागल्यानंतर महिलेने मदतीसाठी आरडाओरडा केला.

त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी आग विझवली. मात्र, तोपर्यंत महिला गंभीररीत्या भाजली होती. त्यानंतर महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नेमके काय आहे प्रकरण ?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील बरुण गावात घडली. महिलेचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तिला मूलबाळ नव्हते.

दरम्यान, विवाहितेचे तिच्या गावातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले होते. यानंतर महिलेला पती सोडून या तरुण प्रियकरासोबत जीवन जगण्याची स्वप्ने पडू लागली. मात्र, प्रकरण खूप पुढे गेले.

बुधवारी रात्री विवाहितेला तिच्या अल्पवयीन प्रियकरासह पकडण्यात आले. याच कारणावरून तिचे पतीसोबत भांडण झाले. यानंतर महिला आणि तिच्या प्रियकराने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.

गुरुवारी सकाळी हे प्रकरण पंचायतीतही गेले. त्यानंतर महिलेने घरी जाऊन अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. त्यानंतर महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्राथमिक उपचारानंतर तिची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. या महिलेच्या प्रेमप्रकरणाची चौकशी सुरू आहे.

महिलेचा जबाब नोंदवल्यानंतर अधिक माहिती स्पष्ट होईल. महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.