LIC IPO चे अर्ज आता किराणा दुकानात

मित्रांनो, तुम्ही किराणा दुकानातूनही LIC IPO मध्ये नवीन सुविधेसह गुंतवणूक करू शकाल.

देशभरातील किराणा दुकानांवर क्यूआर कोड्स लावले आहेत. क्यूआर कोड्सचा वापर करून तुम्हाला सहजपणे डिमॅट खाते उघडता येईल.

क्यूआर कोड्सचा वापर

डिमॅट खाते शेअर बाजारातील ट्रेडिंगसाठी अनिवार्य असते. हे खाते उघडून लोक LIC IPO बोली लावू शकतील.

डिमॅट खाते अनिवार्य

एलआयसी आयपीओसाठी भागीदारी असलेल्या दुकानांमध्ये पेटीएम क्यूआर कोड्स लावणार आहे. यामुळे आयपीओसाठी सहज अर्ज करू शकतील.

पेटीएम क्यूआर कोड्स 

पेटीएम मनीच्या माध्यमातून असा करा एलआयसी आयपीओसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या .

आयपीओसाठी अर्जप्रक्रिया

पेटीएम मनीच्या होम स्क्रीनवरील आयपीओ विभागावर जा. प्राधान्यानुसार गुंतवणूकदाराचा प्रकार निवडा.

स्टेप 1

5 लाख रुपयांहून अधिक बोली लावण्याची इच्छा असलेल्या व्यक्ती एचएनआय प्रवर्गाचा पर्याय निवडून हे करू शकतात.

स्टेप 2

जर तुम्ही विमाधारक असाल तर आयपीओ डिटेल्स या पेजवर ‘इन्व्हेस्टर टाइप’ खाली जाऊन पॉलिसी होल्डर्स निवडा.

स्टेप 3

याशिवाय तुमचा पॅन एलआयसी पॉलिसीशी जोडलेला असणे आवश्यक आहे. तरच अर्ज करता येईल. 

स्टेप 4

आयपीओमधील ‘करंट अँड अपकमिंग’ टॅबमध्ये एलआयसी आयपीओ हा पर्याय उपलब्ध असेल.

स्टेप 5

या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ‘ॲप्लाय नाऊ’ हे बटन दिसेल, ते बटन तुम्हाला बिड पेजकडे घेऊन जाईल.

स्टेप 6

या पेजवर तुम्ही दर अपडेट  करू शकता किंवा तुमच्या अर्जावरील संख्या नोंदवू शकता.  तुमचा यूपीआय आयडी अद्ययावत करा आणि ‘ॲप्लाय’वर क्लिक करा.

स्टेप 7