कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा बॉलिवूडचा गुणी अभिनेता. सध्या कार्तिक त्याच्या ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
दुसरीकडे करण जोहर (Karan Johar) त्याच्या ‘कॉफी विद करण’ या त्याच्या शोच्या नव्या सीझनमुळे चर्चेत आला आहे.
‘दोस्ताना 2’ या चित्रपटावरून कार्तिक व करण यांचं बिनसलं होतं. इतकं की, करणने कार्तिकला बाहेरचा रस्ता दाखवला.
‘दोस्ताना 2’ या चित्रपटाची घोषणा 2019 साली झाली, यानंतर 2021 मध्ये करण व कार्तिक यांच्या बिनसल्याची बातमी समोर आली.
इंडस्ट्रीच्या लोकांसोबत मतभेद व आऊटसाइडर असल्याचा त्रास होतो का? या प्रश्नाचे उत्तर त्याने दिले आहे.
‘मला यामुळे काहीही फरक पडत नाही. मी फक्त कामावर फोकस करतो. माझे अनेक सिनेमे येत आहेत. माझे लक्ष कामावर आहे.
बॉलिवूडमध्ये माझ्या विरोधात कोणतीही लॉबी काम करीत नाही. या सगळ्या अफवा आहेत. कुणाकडेही इतका वेळ नाही.
प्रत्येकाला फक्त काम करायचं आहे आणि चांगलं काम करायचं आहे. याशिवाय तुम्ही इंडस्ट्रीत टिकू शकत नाही.
Read More