नीतीशास्त्रातही स्त्री-पुरुषांचे गुण आणि दोष सांगितले आहेत. याचं गुण-दोषांनुसार असे पुरुष खूप नशीबवान असतात, ज्यांच्या पत्नीमध्ये 4 विशेष गुण असतात.

Chanakya Neeti

चाणक्य नीतीनुसार ज्या महिलांमध्ये हे चार गुण असतात, ते कुटुंब फार आनंदी आयुष्य जगतं. कुटुंबावर कोणतीही अडचण आली तरी स्त्रीच्या कर्तव्यदक्षतेमुळे मोठी संकटं देखील दूर होतं.

अशी स्त्री जी शिक्षित आणि संस्कारी असेस, जिला धर्मग्रथांची माहिती असेल. कुटुंबातील महिलेला चांगलं आणि वाईट यांमधील फरक कळत असेल. अशी स्त्री मुलांवर चांगले संस्कार करू शकेल. ज्यामुळे अशा कुटुंबाची समाजात प्रतिष्ठा तयार होते.

प्रत्येक कुटुंबासाठी बचत फार महत्त्वाची असते. जी महिला कठीण वेळेसाठी पैसे बाजूला ठेवते, अशा स्त्रीयांचे पती फार नशीबवान असतात.

 अशी महिला जी सर्वांसोबत चांगले संबंध ठेवते, समाजात तिचे उत्तम व्यवहार असतील, तर अशा कुटुंबासोबत इतर व्यक्ती देखील प्रेमाने राहतात. घरात नातेवाईक, महात्मा, संत आनंदाने येतात आणि आशीर्वाद देतात.

अशी स्त्री जी धैर्यशाली असते, तिचा पती खूप भाग्यवान असतो कारण अशी स्त्री प्रत्येक संकटाला धीराने तोंड देते. अशी स्त्री सोबत असेल तर पुरुष प्रत्येक आव्हानावर सहज मात करू शकतो.