भारतीय निवडणूक आयोग (ECI) प्रत्येकाला त्यांचे मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्यास सांगत आहे.
भारतीय निवडणूक आयोग (ECI) प्रत्येकाला त्यांचे मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्यास सांगत आहे.
दोन ओळखपत्रे लिंक करण्यामागे मतदार यादीतील नोंदी प्रमाणित करणे, मतदारांची ओळख प्रमाणित करणे आणि एकाच मतदारसंघात एकापेक्षा जास्त वेळा किंवा अनेक मतदारसंघात नोंदणी केली आहे की नाही हे तपासणे हा उद्देश आहे.
तथापि, ECI ने अद्याप मतदान ओळखपत्र किंवा निवडणूक फोटो ओळखपत्र (EPIC) शी आधार लिंक करणे अनिवार्य म्हणजेच सक्तीचे केलेले नाही.
आधार क्रमांक न दिल्यास विद्यमान मतदाराचे नाव मतदार यादीतून काढले जाणार नाही, असे निवडणूक प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.
सर्वप्रथम Google Play Store आणि Apple App Store वरून Voter Helpline App डाउनलोड करा.
आता App उघडा आणि 'I Agree' पर्यायावर क्लिक करा आणि 'Next' वर टॅप करा. यानंतर ''Voter Registration' या पहिल्या पर्यायावर टॅप करा.
आता क्लिक करा आणि इलेक्टोरल ऑथेंटिकेशन फॉर्म (फॉर्म 6B) उघडा. त्यानंतर 'Let's start' वर क्लिक करा.
त्यानंतर आधार कार्डशी लिंक केलेला तुमचा अधिकृत मोबाइल नंबर टाका आणि ओटीपी पाठवा वर टॅप करा.
त्यानंतर तुम्हाला जो OTP मिळेल तो टाका आणि 'Verify' वर क्लिक करा. त्यानंतर Yes I have Voter ID वर क्लिक करा आणि नंतर 'Next' वर क्लिक करा.
तुमचा मतदार आयडी क्रमांक (EPIC) एंटर करा, तुमचे राज्य निवडा आणि ''Fetch Details'' वर क्लिक करा. त्यानंतर Proceed वर क्लिक करा.
त्यानंतर आधार क्रमांक, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि प्रमाणीकरणाचे फील्ड भरा आणि 'Done' वर क्लिक करा.
यानंतर फॉर्म 6B पूर्वावलोकन पृष्ठ उघडेल. तुमचे तपशील दोनदा तपासा आणि तुमचा फॉर्म 6B सबमिट करण्यासाठी 'Confirm' वर क्लिक करा.