नवी दिल्ली, 21 मार्च : इराणच्या विद्यार्थीनी दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पार्ट टाईम सेक्स वर्क करतात, इराणी महिलांना सेक्स वर्कर म्हणून काम करावे लागते, त्यांना दिवसा इतर कामे आणि रात्री सेक्स वर्कर म्हणून काम करावे लागते. शरीर विकून पोट भरायला भाग पाडले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
रिपोर्टनुसार, इराणची राजधानी तेहरानमध्ये राहणारी एक सेक्स वर्कर म्हणते, सेक्स वर्करच्या कामामुळे मला खूप लाज वाटते, पण माझ्याकडे दुसरा पर्याय आहे का?
युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी पार्ट टाईम सेक्स वर्क करते. ती म्हणाली; मी अशा देशात राहते जिथे महिलांचा आदर नाही. देशाची अर्थव्यवस्था कोलमडत आहे आणि सर्व वस्तूंच्या किंमती जवळजवळ दररोज वाढत आहेत.
मी एकटी आहे, मला माझ्या मुलाचीही काळजी घ्यायची आहे आणि आता मला शहराच्या सीमेवर एक छोटेसे घर घ्यायचे आहे. मी माझे शरीर आणि आत्मा रोज विकते हे माझ्या आयुष्यातील कटू सत्य आहे.
2012 मध्ये, इराणने सेक्स वर्कच्या व्यवसायाला आळा घालण्यास्ठी एक राष्ट्रीय कार्यक्रम तयार केला होता. तरीही एनजीओ आणि संशोधकांकडून मिळालेल्या अहवालानुसार सेक्स वर्कर्सची संख्या वाढत आहे.
आता इराणमध्ये तरुण मुलीही सेक्स वर्कर म्हणून काम करत आहेत. इराणमधील अंमली पदार्थांच्या व्यसनाधीन महिलांच्या उपचारा व पुनर्वसनात काम करणाऱ्या आफताब सोसायटी नावाच्या एनजीओनुसार, 2019 मध्ये राजधानी तेहरानमध्ये सुमारे 10,000 सेक्स वर्कर्स होत्या. त्यापैकी जवळपास 35 टक्के विवाहित होत्या हे कटू वास्तव आहे.
इराणमध्ये महिलांसाठी नोकरीच्या संधी खूप कमी आहेत आणि लैंगिक समानतेच्या अभावामुळे, बहुतेक महिला दारिद्र्यरेषेखाली आहेत. यामुळे त्यांना पैशासाठी व उदरनिर्वाह करण्यासाठी सेक्स वर्कर म्हणून काम करावे लागते, जरी या कामात खूप धोका आहे.
अनेक वेळा पैसे मिळत नाहीत
तसंच तेहरानमधली एक युनिव्हर्सिटी विद्यार्थिनी सुद्धा अर्धवेळ सेक्स वर्कर म्हणून काम करते, ती म्हणाली – पुरुषांना माहित आहे की इराणमध्ये सेक्स वर्क बेकायदेशीर आहे आणि महिलांना यासाठी कठोर शिक्षा होऊ शकते.
त्यामुळे पुरुष स्वतःच्या फायद्यासाठी आमच्यावर अत्याचार करू शकतात. अनेक लोक संबंध बनवल्यानंतर पैसे देत नाहीत, माझ्यासोबतही असे अनेकदा घडले आहे, परंतु मी कोणत्याही अधिकाऱ्याकडे तक्रार करू शकत नाही.