Rekha Love Life : रेखाच्या लव्ह लाईफची कहाणी, रेखाने जे रहस्य जगापासून कायम लपवले !

Rekha's Love Life: Rekha's secret hidden from the world!

Rekha Love Life : दो अंजाने (1976) या चित्रपटाच्या सेटवर अमिताभ आणि रेखाची प्रेमकहाणी सुरू झाली, तोपर्यंत अमिताभचे लग्न झाले होते.

रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या हळूवार प्रेम कथेबद्दल तुम्ही बरेच काही ऐकले असेल, पण तुम्हाला माहित आहे का? की रेखाचे इतरही कोणाशी तरी अफेअर होते. रेखाबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया!

रेखाचे रहस्यमय आयुष्य 

Amitabh Bachchan and Rekha

अभिनेत्री रेखाचे आयुष्य जितके सुंदर दिसते तितकेच रहस्यांनी भरलेले आहे. तिच्या आयुष्यातील प्रत्येक पैलू विशेषतः तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

वास्तविक, रेखाचे वैयक्तिक आयुष्य सुरुवातीपासूनच व्यावसायिक आयुष्यापेक्षा जास्त चर्चेत आहे, जरी रेखाने तिच्या ‘वैयक्तिक’ आयुष्यातील अनेक रहस्ये कधीच उघड केली नाहीत.

विनोद मेहरा आणि किरण कुमार यांच्यासोबत नाव जोडले गेले 

Rekha-Vinod Mehera

अमिताभ बच्चन यांच्या आधी रेखाचे विनोद मेहरा आणि किरण कुमार यांसारख्या अभिनेत्यांशी संबंध असल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. रेखाचे अफेअर त्यांच्यासोबत असल्याचेही बोलले जाते.

इंडस्ट्रीबाहेरील लोकांशी तिचे प्रेमसंबंध होते

Rekha - Jaya Bachhan - Amitabh Bachhan

रेखाचे अफेअर इंडस्ट्रीबाहेरील लोकांशीही राहिले आहे. त्यावेळी दक्षिण मुंबईतील प्रतिष्ठित गुजराती कुटुंबातील मुलगा राजा खारासोबत रेखाचे अफेअर असल्याची बातमी आली.

दोघेही मुंबईतील रेस्टॉरंटमध्ये अनेकदा एकत्र दिसले होते. रेखाने या नात्याबद्दल कधीही, कोणालाही, काहीही सांगितले नाही.

लग्नाच्या काही महिन्यांनंतर घटस्फोट झाला

रिपोर्ट्सनुसार, जेव्हा रेखाचे पती मुकेश अग्रवाल यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, तेव्हा त्या दरम्यान रेखावर आरोप झाले होते पण रेखा या आरोपांवर जास्त लक्ष दिले नाही.

रेखाने एका मुलखाती दरम्यान सांगितले होते की, ‘सर्वप्रथम मी सर्वांना सांगू इच्छिते की मुकेशला घटस्फोट घ्यायचा होता, मला नाही. त्याने माझ्याकडून घटस्फोट मागितला.

पती मुकेश अग्रवाल यांच्या आईलाही रेखा आवडत नव्हती. रेखासोबत लग्न केल्यानंतर तब्बल 6 महिन्यांनी पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा. आणखी अशाच रंजक आणि उपयुक्त माहितीसाठी, राजनेता.कॉम या वेबसाइटशी कनेक्ट रहा.