Rape of a Minor Girl in Pune : पुण्यात सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Mumbai Crime: Schoolboy arrested for raping 6-year-old girl in Mulund

पुणे : पीडितेच्या आईने फिर्याद दिल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे स्टेशनजवळील सार्वजनिक शौचालयात ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी साफ सफाईचे काम करते. शुक्रवारी दुपारी ती सार्वजनिक शौचालयात गेली होती.

यावेळी आरोपी तिच्या मागे शौचालयात गेला. त्याने तिला खाली पाडले आणि जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर आरोपींने घटनास्थळावरून पळ काढला.

पीडित महिला तिच्या कुटुंबासोबत राहते. हा सर्व प्रकार तिने आईला सांगितला. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. पीडितेच्या आईने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात आरोपी हा पीडितेच्या कुटुंबाचा जवळचा ओळखीचा असल्याचे समोर आले आहे. तो दररोज पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाला भेटायला जायचा.

गुन्हा घडल्यापासून तो बेपत्ता होता. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुण्यातील सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून नराधम फरार झाला आहे.

पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात सार्वजनिक शौचालयात 12 वर्षीय मुलीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.