अरे गधड्या, तुझी सावरकरांवर बोलायची लायकी तरी आहे का? राज ठाकरे यांचा राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल

Raj Thackeray attacks Rahul Gandhi

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गटनेत्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी स्वतंत्र वीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते.

त्यांच्या वक्तव्यावर आज राज ठाकरेंनी रोखठोक भूमिका घेतली. यावेळी त्यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. “अरे गधड्या, सावरकरांबद्दल बोलायलाही तुझी लायकी आहे का? सावरकर कोण होते हे तुला माहीत आहे का? त्यांना कुठे ठेवले होते ते काय करत होते? त्यांना काय त्रास सहन करावा लागला?” असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

फक्त महापुरुषांचीच बदनामी होत आहे. त्यादिवशी राहुल गांधी महाराष्ट्रात आले, तो नुसता गुळगुळीत मेंदूचा आहे. राहुल गांधी बोलतात की त्याच्या मागून आरडी बर्मन बोलतात हेच कळत नाही, अशी टीका राज ठाकरेंनी केली.

म्हणे सावरकरांनी माफी मागितली. दयेचा अर्ज केला. त्यांनी एक स्ट्रॅटेजी वापरली. अहो, सर सलामत तर पगडी पचास. पन्नास वर्षांची शिक्षा झालेला माणूस आतमध्ये सडत राहण्यापेक्षा त्यांच्याशी खोटं बोलून मी बाहेर येतो आणि बाहेर आल्यावर पुन्हा हंगामा करतो हे डोक्यात सगळं चालू असेल त्याला स्ट्रॅटेजी म्हणतात, असं राज ठाकरे म्हणाले.

आपली कृष्ण नीति आपल्याला काय सांगते? काही चांगलं घडणार असेल, ते घडवण्यासाठी खोटं बोलावं लागत असेल तर खोटं बोलाव. पण ते होणे गरजेचे आहे’, असे ठाकरे म्हणाले.

आमच्या शिवरायांनी मिर्झाराजांना गड किल्ले दिले, तेव्हा चितळेची बर्फी होती का? गडकिल्ले घेऊन जा. अशी परिस्थिती होती त्यावेळी. मावळे थकले होते. आर्थिक अडचणी होत्या. अनेक गोष्टी होत्या आणि सैन्याला तोंड देणे शक्य नव्हते, म्हणून तह केला” राज ठाकरे म्हणाले.

काय करायचे होते? तुम्हाला किल्ले लिहून द्यायचे आहेत का? चला लिहून देऊ या. तो घेऊन तर जाणार नाही ना? जर परिस्थिती स्पष्ट झाली तर आम्ही ते परत घेऊ. किल्ला तिथेच आहे. याला रणनीती म्हणतात. ज्याला ही रणनीती समजत नाही तो गुळगुळीत मेंदू आहे, अशी टीका त्यांनी केली.

देशात या गोष्टी थांबल्या पाहिजेत. जसं काँग्रेसला सांगावं लागतं तसं भाजपलाही सांगावं लागतं. बस करा स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या महापुरुषांची बदनामी करून काय मिळणार आहे?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

हे देखील वाचा