PM Kisan Yojana Update : केंद्र सरकार देशभरातील करोडो शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देते. तीन हप्त्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या या रकमेतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. आता शेतकरी 11व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लवकरच पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता हस्तांतरित केला जाऊ शकतो. आतापर्यंत दहा हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. शेवटचा हप्ता 1 जानेवारी 2022 रोजी हस्तांतरित करण्यात आला आहे.
दरम्यान, पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर ई-केवायसी संदर्भात एक मोठे अपडेट जारी करण्यात आले आहे, ज्याचा शेतकऱ्यांवर परिणाम होणार आहे.
वास्तविक, सरकारने OTP द्वारे ई-केवायसी करण्याची सुविधा रद्द केली आहे. याबाबतची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
तथापि, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेले नाही, ते तरीही जवळच्या सीएससी केंद्रांना भेट देऊन बायोमेट्रिक प्रमाणीकरण करून घेऊ शकतात. फक्त आधार कार्ड आधारित OTP प्रमाणीकरण निलंबित करण्यात आले आहे.
अलीकडेच सरकारने पीएम किसानसाठी ई-केवायसीची अंतिम तारीख वाढवली आहे. जिथे आधी अंतिम तारीख ३१ मार्च होती, ती आता ३१ मे २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
जर तुम्ही केवायसी केली नाही, तर तुम्ही पुढील हप्तापासून वंचित राहू शकता. तेव्हा ज्यांनी KYC केली नाही त्यांनी मुदतीत करून घ्यावी.