मुंबई : नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. ईडीने नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक केली आहे. त्यानंतर नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांच्या मालमत्तेवरही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, न्यायालयाने आता नवाब मलिकच्या कोठडीत 22 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. नवाब मलिक यांनी तब्येतीच्या समस्येची तक्रार केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
यापूर्वी नवाब मलिक (Nawab Malik) यांना पोटदुखीचा त्रास होत होता. त्यानंतर त्यांना नियमित वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, नवाब मलिक यांचे आता पाय सुजल्याचे सांगण्यात येत आहे.
Maharashtra minister and NCP leader Nawab Malik's judicial custody has been extended till April 22, in a money laundering case.
— ANI (@ANI) April 18, 2022
किडनीच्या आजारामुळे त्यांच्या पायांना सूज येते. कारागृह प्रशासनाकडून त्यांना वेदनाशामक औषधेही देण्यात येत होती. मात्र, मलिक यांनी रीतसर उपचार करण्याची मागणी केली होती.
दिलासा नाही!
आज नवाब मलिक यांना दिलासा मिळणार का, असा प्रश्न सर्वांना पडला होता. कारण नवाब मलिकांची न्यायालयीन कोठडी आज (18 एप्रिल 2022) संपत होती.
मात्र, त्याच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. विशेष सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला.
दुसरीकडे, आता नवाब मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.
मुंबई उच्च न्यायालयाने विशेष सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवत मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे या प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात येणार आहे. प्रसिद्ध वकील कपिल सिब्बल सर्वोच्च न्यायालयात मलिक यांची बाजू मांडणार आहेत.
नवाब मलिक यांच्यावर काय आरोप आहेत?
अंडरवर्ल्ड डॉन आणि फरार दाऊन इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये नवाब मलिकांना अटक करण्यात आली होती.
आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ही अटक करण्यात आली. ईडी तपासात मलिकांनी सहकार्य केलं नसल्याचा दावा करत ही अटक करण्यात आली होती.
आठ ठिकाणी कारवाई
दरम्यान, नवाब मलिक यांच्या आठ मालमत्ता नुकत्याच ईडीने जप्त केल्या होत्या. यामध्ये मुंबई आणि उस्मानाबादमधील मालमत्तांचा समावेश आहे.
आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत मुंबईतील वांद्रे येथील एका घराचाही समावेश होता.