नवी दिल्ली : पाच राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. यापैकी चार राज्यांमध्ये भाजपला मोठे यश मिळाले आहे. या चार राज्यांत भाजपने सत्ता कायम ठेवली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या प्रगतीचा आलेख उंचावल्याचे बोलले जात आहे.
मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत एक मोठी भविष्यवाणी करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावरून पायउतार होतील आणि त्यांच्या जागी भाजपची प्रमुख व्यक्ती येईल. त्या व्यक्तीबाबत आणि पंतप्रधान मोदी कधी पद सोडतील, याबाबत अंदाज वर्तवण्यात आले आहेत.
उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर महामंडलेश्वर स्वामी यतिंद्र आनंद गिरी यांनी पंतप्रधान मोदींबाबत भाकीत केले आहे. राष्ट्रवादाच्या नावाखाली पंतप्रधान मोदी स्वतः पंतप्रधानपदावरून पायउतार होऊन योग्य व्यक्तीकडे जबाबदारी सोपवतील, असे महामंडलेश्वर स्वामी यतिंद्र आनंद गिरी यांनी सांगितले.
महामंडलेश्वर स्वामी यतिंद्र आनंद गिरी यांच्यानुसार ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्य वर्तवल्यास नरेंद्र मोदी हे १२ वर्षे देशाचे पंतप्रधान राहतील.
12 वर्षे या पदावर राहिल्यानंतर मोदी दिल्लीच्या राजकारणापासून दूर जातील, असे महामंडलेश्वर स्वामी यतिंद्र आनंद गिरी यांनी म्हटले आहे.
महामंडलेश्वर स्वामी यतिंद्र आनंद गिरी यांनी केलेल्या भाकितानुसार नरेंद्र मोदींनंतर योगी आदित्यनाथ हेच पंतप्रधान होतील. नरेंद्र मोदी स्वतः राजकारणातून निवृत्त होणार आहेत.
यातून ते सर्वांसमोर एक आदर्श ठेवतील ज्यातून ते राजकीय इतिहास घडवतील. महामंडलेश्वर स्वामी यतिंद्र आनंद गिरी यांनी उत्तर प्रदेशातील महोबा येथे स्वजन शिष्य संमेलनात बोलताना हे भाकीत केले आहे.
नरेंद्र मोदी दोन वर्षांनी निवृत्त होणार आहेत
नरेंद्र मोदी हे मे 2014 पासून भारताचे पंतप्रधान आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत, भारतीयांनी पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप आणि सहयोगी पक्षांना मतदान केले आणि त्यांना पंतप्रधान होण्याची दुसरी संधी दिली.
महामंडलेश्वर स्वामी यतिंद्र आनंद गिरी यांच्या भाकितानुसार २०२४ च्या निवडणुकीनंतरही नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. मात्र, 2026 मध्ये दोन वर्षांत निवृत्त होणार असल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, पंतप्रधान मोदींचा 12 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून योगी आदित्यनाथ दिल्लीचे तख्त सांभाळणार आहेत. योगींनी पंतप्रधान व्हावे आणि हिंदू राष्ट्रवादाचे स्वप्न पूर्ण करावे, अशी इच्छा गिरी यांनी व्यक्त केली आहे.
योगी आदित्यनाथ यांनी सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भविष्यात योगी हेच पुढचे पंतप्रधान असतील अशी अफवा पसरवली जात आहे.