मुंबई पोलिसांचे लाऊडस्पीकर आणि भोंग्यांबाबत नियम

0
51
Crime on third mosque in Mumbai: Supreme Court order violated!

मुंबई : राज्यात सध्या मशिदींवरील भोंगे आणि लाऊडस्पिकर्सचा मुद्द गाजत आहे. यासंदर्भात अनेक तक्रारी मुंबई पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. या तक्रारींवर पोलिसांनी कामही सुरु केलं आहे. (Mumbai Police Rules on Loudspeakers and Noises)

रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत ध्वनिप्रदूषणाबाबत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन केले जाईल याची खबरदारी घेतली जाणार आहे.

तसेच या नियमांचे पालन करणा-या मंदिरे आणि मशिदींनाच यासाठी परवानगी दिली जाईल असे मुंबई पोलिसांनी आपल्या नव्या निर्देशांमध्ये म्हटले आहे.

मुंबई पोलिसांनी यापूर्वीच समाजविघातक कृत्ये, चिथावणीखोर वक्तव्ये, धार्मिक गुन्ह्यात गुंतलेल्या आरोपींची यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे.

तसेच आयपीसी कलम १४४, १४९ आणि १५१ अंतर्गत अनियंत्रित घटकांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा विचार केला जात आहे. काही लोकांना आधीच प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

मुंबई पोलिसांची अशी आहे नियमावली

  • अनेक मशिदी आणि मंदिरे ही वैध आहेत, परंतू जी अवैध आहेत किंवा नियमांचे पालन न करता बांधलेली आहेत, अशा धार्मिकस्थळांना लाऊडस्पीकर आणि भोंग्यांना परवानगी दिली जाणार नाही.
  • रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत ध्वनिप्रदूषणाबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करतील अशाच मंदिरं आणि मशिदींना लाऊडस्पीकर्स आणि भोंगे वापरण्यास परवानगी दिली जाईल.
  • जी धार्मिकस्थळे सायलेंट झोनमध्ये नाहीत त्यांनाच लाऊडस्पीकरला परवानगी दिली जाईल.
  • लाऊडस्पीकरच्या परवानगीसाठी संबंधित मशीद किंवा मंदिराची रचना कायदेशीर आहे की नाही याची पडताळणी केली जाईल.
  • बेकायदेशीर लाऊडस्पीकर आणि भोंगे लावून नियमांचं उल्लंघन करणा-या धार्मिक संस्थांवर महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम ३३ आणि १३५ सह सर्व विद्यमान नियमांनुसार कारवाई केली जाईल.
  • तसेच नियमांचे उल्लंघन करणारे लाऊडस्पीकर जप्त केले जातील. नियमभंग करणा-या संस्थेला १२ हजार रुपयांचा दंडही ठोठावला जाईल.