Mumbai Crime : 15 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, 3 अल्पवयीन मुलांसह 6 आरोपी

42
Mumbai: 15-year-old girl gang-raped, 3 minors among 6 accused

Mumbai Crime | मुंबई : महाराष्ट्रातील एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींपैकी ३ आरोपी अल्पवयीन असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी तीनही अल्पवयीन आरोपींना डोंगरी भागातील बालसुधारगृहात पाठवले आहे. एनएम जोशी मार्ग पोलिसांनी आयपीसीच्या कलम 376 (डी) (2) (एन), 34 आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 4, 5, 6, 8, 10, 12, 17 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

एनएम जोशी पोलिसांनी सांगितले की, उर्वरित 3 प्रौढ आरोपींना काल न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि अल्पवयीन मुलगी एकाच परिसरातील असून ते एकमेकांच्या ओळखीचे होते.

हे देखील वाचा