उदगीर : दिनांक २३ आणि २४ रोजी उदगीरच्या जिल्हा परिषद मैदानात होणाऱ्या १६ व्या विद्रोही साहित्य संमेलनात चार महनीय व्यक्तींचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
प्रत्येक संमेलनात जिल्ह्यातील आपापल्या क्षेत्रातील विशेष उल्लेखनिय कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. यंदाच्या विद्रोही साहित्य संमेलनात निस्पृह सामाजिक सेवेबद्दल रंगा रचूरे यांना, तत्वज्ञान व सामाजिक प्रबोधनातील कार्याबद्दल प्राचार्य नागोराव कुंभार यांना, आंबेडकरी चळवळीतील आजीवन कार्याबद्दल व निस्पृह पत्रकारितेबद्दल रामराव गवळी, तर अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील विशेष कार्याबद्दल मा. माधव बावगे यांना जीवगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी, स्वागताध्यक्ष डॉ. अंजुम कादरी, कार्याध्यक्ष अरविंद पाटील एकंबेकर राज्य संघटक किशोर ढमाले, मुख्य संयोजक निवृत्ती सांगवे, अहमद सरवर, मारोती कसाब, अमित राठोड राजकुमार माने, प्रदीप ढगे, श्रीनिवास एकुरकेकर, सिध्देश्वर लांडगे सुधीर दत्ता खंकरे यांनी कळविले आहे.