Indian Currency Note : मैं धारक को ‘रुपये’ अदा करने का वचन देता हूं, प्रत्येक नोटेवर असे का लिहिलेले असते?

0
39
Indian Currency Note

Indian Currency Note : जर तुम्ही बाजारातून काही खरेदी करायला गेला असाल तर तुम्हाला तेथील वस्तूंच्या बदल्यात काही रुपये द्यावे लागतात. हे रुपये काही कागदाच्या नोटा वाटत असल्या तरी त्यामागे खूप मोठा व्यवहार दडलेला आहे.

जर तुम्ही हातातील नोट कधी लक्ष देऊन पाहिली असेलतर तुम्हाला कळेल की प्रत्येक नोटवर एक वाक्य लिहिलेले दिसून येते, हे वाक्य असते;

‘मैं धारक को… रुपये अदा करने का वचन देता हूं’

हे वाक्य 10 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंतच्या नोटांवर लिहिलेले आहे. पण याचा अर्थ काय असा तुम्ही कधी विचार केला आहे का? जर समजा असे लिहिलेले नसेल तर? याचे कारण जाणून घेऊ या.

पहिल्यांदा हे लक्षात घ्या कि, भारतातील सर्व नोटा बनवण्याची आणि वितरित करण्याची जबाबदारी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ची आहे. धारकाला विश्वास देण्यासाठी रिझर्व्ह बँक हे वचन नोटवर लिहिते.

याचा अर्थ तुमच्याकडे जी नोट आहे, त्याच मूल्याचे सोने आरबीआयकडे राखीव आहे. म्हणजेच 100 किंवा 200 रुपयांच्या नोटेसाठी धारकावर 100 किंवा 200 रुपयांचे दायित्व असल्याची हमी आहे.

एक रुपयाच्या नोटेवर आरबीआय गव्हर्नरची सही नाही

यासोबतच दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भारतात 1 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंतच्या नोटा चलनात आहेत. या सर्व नोटांच्या मूल्यासाठी आरबीआय गव्हर्नर जबाबदार आहेत.

एक रुपयाची नोट वगळता इतर सर्व नोटांवर RBI गव्हर्नरची सही असते. त्याच वेळी, एक रुपयाच्या नोटेवर मात्र भारताच्या वित्त सचिवांची स्वाक्षरी असते.

तिरकस रेषा नोटवर का असतात

तुमच्या लक्षात आले असेल की 100, 200, 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांच्या बाजूला तिरकस रेषा आहेत. याला ‘ब्लीड मार्क्स’ म्हणतात.

या ब्‍लीड मार्क्‍स खास दृष्टिहीनांसाठी बनवल्या जातात. नोटेवरील या ओळींना स्पर्श करून ते किती रुपयांची नोट आहे हे सांगू शकतात. त्यामुळेच 100, 200, 500 आणि 2000 च्या नोटांवर वेगवेगळ्या रेषा बनविल्या जातात.