Chandrakant Patil On CM Uddhav Thackeray: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, मला उद्धव ठाकरेंची कुंडली बघायची आहे, काय भाग्यवान माणूस आहे. कशाचं सोयर सुतक नाही, काही काम नाही, पण त्यांना कुणी हलवू शकत नाही, असं पाटील म्हणाले.
पाटील म्हणाले की, सर्व आमदार काम घेऊन एकनाथ शिंदे यांच्याकडे जातात. उद्याच्या सामन्यातून माझी खिल्ली उडवली जाईल. मात्र तुम्ही कोणाची खिल्ली उडवत आहात हे काळच दाखवेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
डायरीच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, डायरी सापडली का? तुम्हाला त्यात काही सापडले का? मला माहित नाही पण मला खूप काही दिसत आहे.
या चौकशीतून आता कोणीही सुटणार नाही. संजय राऊत माझ्यावर सारखे विनोद करतात पण त्यांच्यावर वेळ उलटणार आहे, असे ते म्हणाले.
सांगलीतील अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या वादावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक आम्ही सत्तेत असताना उभारले.
होळकर यांच्या स्मारकाचे उद्घाटन होणार आहे. मात्र विरोधी पक्षनेत्यालाही निमंत्रित केले नाही. ते म्हणाले की, शरद पवार येईपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, पोलिस दबाव आणत आहेत, ते फार काळ टिकणार नाही. कोल्हापुरातही आठ वर्षांपूर्वीची प्रकरणे समोर येत आहेत.
महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी आपआपली बाड बिस्तरा बांधला आहे. किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीसाठी कर्दनकाळ ठरणार आहेत.
अजितदादा, फुकट श्रेय घ्या पण एसटी कामगारांचा संप मिटवा, असं पत्र लिहिलंय. हा संप फक्त अजितदादाच संपवू शकतात, असे ते म्हणाले.