वंचित बहुजन आघाडीसह पाच संघटनांचा राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला विरोध

0
37
Five organizations, including the deprived Bahujan Alliance, oppose Raj Thackeray's rally in Aurangabad

औरंगाबाद : राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी मिळणार का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला असून वंचित बहुजन आघाडीसह पाच संघटनांनी राज ठाकरेंच्या सभेला विरोध करीत सभेला परवानगी नाकारण्याचे निवेदन बुधवार दि. २० एप्रिल रोजी पोलिसांना दिले आहे.

औरंगाबादमध्ये १ मे रोजी होणा-या सभेसाठी मनसेने जोरदार तयारी सुरु केली आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दि. १९ एप्रिल रोजी या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

मात्र राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळणार का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. कारण वंचित बहुजन आघाडीसह पाच संघटनांनी राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला विरोध केला आहे.

राज यांच्या या सभेला परवानगी नाकारण्यात यावी असे पत्र या पाच संघटनांनी पोलिस आयुक्तांना पाठविले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी घोषणा केलेल्या १ तारखेच्या सभेला परवानगी मिळते का असा प्रश्न आहे.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न

एकीकडे मनसेने राज ठाकरेंच्या सभेसाठी तयारी सुरु केली असताना दुसरीकडे विरोध केला जात आहे. सध्याची परिस्थिती, रमाजानचा महिना आणि कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा असे विविध विषय उपस्थित करत अनेक संघटना दररोज पोलिस आयुक्तांना भेटून राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देऊ नये अशी निवेदने दिली जात आहेत आहे.

कोणत्या पक्ष संघटनांचा विरोध?

१. वंचित बहुजन आघाडी
२. प्रहार संघटना
३. मौलांना आझाद विचार मंच
४. गब्बर अ‍ॅक्शन संघटना
५.ऑल इंडिया पँथर सेना

सभेला अद्याप पोलिसांची परवानगी नाही

तर मनसेने पोलीस आयुक्त कार्यालयात राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळावी यासाठी निवेदन दिले. यावर पोलिस आयुक्त, दोन पोलिस उपायुक्त आणि सभा ज्या ठिकाणी होणार आहे.

त्या परिसरातील पोलिस निरीक्षक यांची बैठक झाली. त्यात राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

२०११ मध्ये मनसेचे तत्कालीन आमदार हर्षवर्धन जाधव यांना झालेल्या मारहाणीविरोधात राज ठाकरेंनी सभा घेतली होती.

परंतु पोलिसांनी मनसेला ताटकळत ठेवत सभेच्या चार तास आधी परवानगी दिली होती. आता राज ठाकरेंच्या १ मे रोजी होणा-या सभेसाठी पोलिस अशीच रणनीती आखणार असल्याची चर्चा आहे.