आपल्या मुलांना शिकविणाऱ्या शिक्षिकेवर डॉक्टरचा बलात्कार; गर्भपातही केला

144
अनैसर्गिक शारीरिक संबंध करत महिलेवर अत्याचार, डॉक्टरवर गुन्हा दाखल

लखनऊ : महिला आणि खासकरुन अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीत.

कितीही कडक कायदे केले तरी त्याचा कुठलाही वचक राहिलेला दिसत नाही.

आताही उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे एक गंभीर प्रकार समोर आला आहे. आपल्याच मुलांना शिकवणाऱ्या अल्पवयीन शिक्षिकेवर डॉक्टरने बलात्कार केला.

तसेच अश्लिल फोटो आणि व्हिडिओ बनवून तो बराच काळ तिचे लैंगिक शोषण करत होता. ती गरोदर राहिल्यानंतर तिचा गर्भपातही केला.

लखनऊ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरानगरमध्ये मुलांना शिकवणी देणाऱ्या अल्पवयीन शिक्षकाशी डॉक्टरने गैरवर्तन केले.

डॉक्टरच्या अत्याचाराला कंटाळून पीडितेने घरच्यांना सर्व प्रकार सांगितला.

त्यानंतरच पीडितेने आरोपी डॉ. आशिष कुमार सिंह उर्फ ​​शेखरविरुद्ध पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली आहे.

शिक्षिकेने तक्रारीत म्हटले आहे की, ती डॉ. शेखर यांच्या मुलाला शिकवायला घरी जात असे. एके दिवशी डॉ शेखर हे एकटेच घरी होते.

शेखरने तिला बसवले आणि चहा दिला. मात्र डॉ. शेखरने चहामध्ये नशेच्या गोळ्या मिसळल्या होत्या. त्यामुळे ती बेशुद्ध झाली.

यादरम्यान शेखरने तिचा अश्लील व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ​​शेखर तिला ब्लॅकमेल करु लागला.

तसेच, तिच्यावर वारंवार बलात्कार केला. याचदरम्यान, शिक्षिका शेखरपासून गर्भवती राहिली.

त्यामुळे शेखरने तातडीने तिला औषधे दिली आणि तिचा गर्भपात केला.

त्याची कृत्ये सातत्याने वाढू लागल्यावर पीडितेने हा प्रकार घरच्यांना सांगितला.

पीडितेने सांगितले की, डॉ. शेखरने सॉफ्टवेअरद्वारे एडिट करून तिचा अश्लील फोटो काढला होता. त्यानंतर त्याने तिला तो दाखविला.

तसेच, सातत्याने धमकावले आणि गैरवर्तन करत व्हिडिओ बनवला. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन बराच काळ शोषण केले.

दरम्यान, पोलिस निरीक्षक रामेश्वर कुमार यांनी सांगितले की, आरोपी बीएएमएस डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.