Delhi Crime News : दिल्लीत 2 बांगलादेशी अटक, आरोपींकडे डझनभर पासपोर्ट आणि 10 मंत्रालयांचे शिक्के सापडले

Delhi Crime News : 2 Bangladeshis arrested in Delhi, dozens passports and stamps of 10 ministries found with accused

Delhi Crime News:  दिल्ली पोलिसांनी रविवारी पालम परिसरातून दोन बांगलादेशी नागरिकांना अटक केली. आरोपींकडून सुमारे 1 डझन पासपोर्ट आणि बांगलादेश मंत्रालयाचे 10 बनावट शिक्के जप्त करण्यात आले आहेत.

द्वारका डीसीपी एम हर्षवर्धन यांनी सांगितले की, मोहम्मद मुस्तफा आणि मोहम्मद हुसैन अशी अटक आरोपींची नावे आहेत. दोघांची चौकशी सुरू आहे.

विशेष तपासणी मोहिमेदरम्यान बांगलादेशी पकडले

15 ऑगस्टपूर्वी देशाच्या राजधानीत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. पोलिस घरोघरी जाऊन चेकिंग करत आहेत, त्याच चेकिंग दरम्यान पोलिसांनी या दोन्ही आरोपींना पकडले आहे.

पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून बांगलादेशचे परराष्ट्र मंत्रालय, कायदा मंत्रालय आणि बांगलादेशच्या नोटरीचे शिक्के जप्त केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही आरोपी किडनी आणि अवयव प्रत्यारोपणासाठी बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या टोळीचा भाग आहेत.

Jalgaon Double Murder : मुलावर गोळी झाडली, मुलीचा गळा दाबला, चोपड्यात प्रेमप्रकरणातून हत्याकांड

या प्रकरणी द्वारका येथील खासगी रुग्णालयाची भूमिका पडताळून पाहण्यासाठी पोलिसांनी रुग्णालयाला नोटीसही दिली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींमध्ये कोणताही दहशतवादी अँगल नाही.

हे देखील वाचा