CSK vs KKR Live Score, IPL 2022 : धोनीने रचला पाया, जाडेजा झालासे कळस!

0
63
CSK vs KKR Live Score, IPL 2022 : धोनीने रचला पाया, जाडेजा झालासे कळस!

CSK vs KKR Live Score, IPL 2022 : एमएस धोनी पुन्हा एकदा चेन्नईसाठी संकटमोचक ठरला आहे. संघ अडचणीत असताना धोनी फलंदाजीसाठी मैदानात आला होता. त्याने 38 चेंडूत नाबाद 50 धावा फटकावल्या.

यात सात चौकार आणि एक षटकार आहे. उलट कर्णधार रवींद्र जाडेजाच थोडा दबावाखाली वाटला. त्याने 28 चेंडूत नाबाद 26 धावा केल्या.

फक्त एक चौकार त्याने लगावला. कोलकाताने आज टिच्चूक गोलंदाजी केली. CSK ने निर्धारीत 20 षटकात पाच बाद 131 धावा केल्या.

चेन्नईचा संघ अडचणीत आहे. त्यांच्या 17 षटकात पाच बाद 84 धावा झाल्या आहेत. धोनी 19 आणि जाडेजा 16 धावांवर खेळतोय.

चेन्नईचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. एमएस धोनी फलंदाजी मैदानात आला आहे. रसेलच्या गोलंदाजीवर शिवम दुबेने नरीनकडे सोपा झेल दिला. शिवम दुबेने तीन धावा केल्या. चेन्नईच्या 11 षटकात पाच बाद 61 धावा झाल्या आहेत.

चेन्नई सुपर किंग्सचा संघ अडचणीत सापडला आहे. रॉबिन उथाप्पा पाठोपाठ अंबाती रायडू पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. कॅप्टन रवींद्र जाडेजा आणि रायडूमध्ये धाव घेताना गोंधळ उडाला. रायडू 15 धावांवर रनआऊट झाला. CSK ची स्थिती चार बाद 52 आहे.

फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर KKR च्या शेल्डन जॅक्सनने जबरदस्त स्टम्पिंग केलं. त्याने क्रीझ बाहेर गेलेल्या रॉबिन उथाप्पाला आऊट केलं. उथाप्पा 28 धावांवर आऊट झाला. त्याने दोन चौकार आणि दोन षटकार लगावले.

सात षटकात चेन्नईच्या दोन बाद 40 धावा झाल्या आहेत. रॉबिन उथाप्पा 29 आणि अंबाती रायडू सात धावांवर खेळतोय.

उमेश यादवने CSK ला दुसरा झटका दिला आहे. डेवॉन कॉनवेला उमेश यादवने तीन धावांवर श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केले. CSK च्या दोन बाद 28 धावा झाल्या आहेत.

चार षटकात चेन्नई सुपर किंग्सच्या एक बाद 28 धावा झाल्या आहेत. या षटकात रॉबिन उथाप्पाने शिवम मावीच्या गोलंदाजीवर बाऊन्सरवर षटकार ठोकला. उथाप्पा 22 आणि कॉनवे 3 धावांवर खेळतोय.

क्रिकेट चाहते आतुरतेने ज्याची वाट पाहत असतात, तो क्रिकेटचा सण आज सुरु झाला आहे. इंडियन प्रीमियर लीगचा 15 वा सीजन (IPL 2022) आजपासून सुरु होतोय.

चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये (CSK vs KKR) सलामीचा सामना होत आहे. यावेळी चेन्नईच्या टीममध्ये एक मोठा बदल दिसणार आहे. यंदा एमएस धोनीऐवजी (MS Dhoni) रवींद्र जाडेजा टीमची कॅप्टनशिप भूषवताना दिसणार आहे.

दोन दिवसांपूर्वी धोनीने टीमची कॅप्टनशिप जाडेजाकडे सोपवली. कोलकाताचा संघ श्रेयस अय्यर या नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली नवी इनिंग सुरु करणार आहे. सलामीचा सामना जिंकून विजयी शुभारंभ करण्याचा दोन्ही टीम्सचा प्रयत्न असेल.