Crime News : पळवून नेलेल्या मुलीला दिवास्वप्न दाखवून तिच्यावर बलात्कार

0
37
Rape of a woman who went to see a rented house; Real estate agent arrested

धुळे / पिंपळनेर : माझे मोठे घर आहे, तुला काही एक काम करावे लागणार नाही, आपण गुजरातमध्ये फिरायला जावू अशी दिवा स्वप्ने दाखवून अल्पवयीन मुलीस सव्वा महिन्यांपूर्वी पळवून नेण्यात आले होते.

मुलीनेही त्यावर विश्वास ठेवत घर सोडले मात्र आता ही मुलगी घरी परतली असून तीने बलात्काराची फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सटाणा तालुक्यातील कुपखेडा येथील एक अल्पवयीन मुलगी (दि. १०) जून रोजी सायंकाळी पाच वाजेला घरातून निघून गेली होती.

तिचा शोध सुरू असतांना तिच्या आजोबांना मुलीस आनंद अमरसिंग पाडवी रा. रोझवा, ता. तळोदा याने पळवून नेल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने त्यांनी १४ जून रोजी पोलिसांत फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला होता.

दरम्यान, काल पीडित मुलगी घरी परतली व तीने आपल्यावर बलात्कार झाल्याचे सांगितले. पालकांनी तिला पोलीस ठाण्यात नेले असता पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवून घेतला.

मुलीने रोझवा येथील आनंद अमरसिंग पाडवी हा नेहमी मला माझ्याशी लग्न कर, आपण आनंदात राहू, मी तुला माझ्या गावाला घेवून जाईल.

तिथे माझे मोठे घर आहे. तिथे तुला एकही काम करण्याची गरज पडणार नाही. अशा भुलथापा देत असे. तिही त्याच्या भुलथापांना बळी पडली व त्याच्यासोबत घरसोडून निघून गेली.

रोझवा येथे मुलाने माझ्याशी शारिरीक संबंध ठेवल्याची माहिती तीने पोलिसांना दिली. त्यानुसार अपहरणासह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.