चेंबूर हत्याकांड हे लव्ह जिहादचे प्रकरण, आरोपींवर पॉक्सो आणि एट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा : नितेश राणेंची मागणी

Chembur massacre case of love jihad, case against accused under POCSO and Atrocity: Nitesh Rane demands

Chembur Massacre Case of Love Jihad | मुंबई : चेंबूरमधील विवाहितेची हत्या हा लव्ह जिहादचा प्रकार असून पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी पॉक्सो आणि एस्ट्रोसिटी अंतर्गत गुन्हा नोंदवावा, अशी मागणी भाजप नेते नितेश राणे यांनी केली आहे.

चेंबूर येथील रहिवासी रुपाली चंदनशिवे हिची पतीने धार्मिक विधी पाळली नाही म्हणून हत्या केली होती. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आणि नितेश राणे आज रुपालीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेले.

पुणे : Loan App द्वारे फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पुणे पोलिसांनी हजारो खाती गोठवली, १८ जणांना अटक

यासंदर्भात मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल, असे आश्वासन दिले. नितेश राणे यांनी पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त केली.

तसेच मृत रुपालीच्या आरोपीला एट्रॉसिटी, पॉस्को का लावण्यात आला नाही? असा प्रश्न विचारला. रुपालीच्या कुटुंबाला संरक्षण मिळावे, अशी मागणी त्यांनी केली.

रुपाली चंदनशिवे

भाजप नेते नितेश राणे म्हणाले, रुपालीच्या वडिलांना आणि तिच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण मिळावे. मुलगी अल्पवयीन आहे.

मात्र अद्याप तिच्यावर पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे आरोपींवर पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. त्यांच्यावरही एट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चेंबूर प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचेही नितेश राणे यांनी सांगितले. त्या कुटुंबांना काहीही झाले तरी आम्ही पोलिसांना सोडणार नाही, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

काय प्रकरण आहे?

धार्मिक प्रथा न पाळल्याचा आणि मुलाचा ताबा न दिल्याच्या रागातून आंतरधर्मीय विवाहित पतीने पत्नीचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना चेंबूरमध्ये घडली आहे.

इक्बाल शेख असे आरोपीचे नाव असून, पहिल्या पत्नीला मूल होत नसल्याने त्याने तीन वर्षांपूर्वी रुपाली चंदनशिवेशी लग्न केले. त्यांना दोन वर्षांचा मुलगाही आहे.

इक्बाल शेख

मात्र लग्नानंतर रुपालीला मुस्लिम रितीरिवाज पाळता आले नाहीत. यावरून तिची आणि इक्बालची रोज भांडणे व्हायची. त्यामुळे ते गेल्या सहा महिन्यांपासून वेगळे होते.

मात्र शुक्रवारी सायंकाळी त्याने रुपालीला नागेवाडी परिसरात भेटण्यासाठी बोलावले आणि रस्त्यात चाकूने वार करून पळ काढला. रुपालीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी इक्बालला पोलिसांनी हातकडी लावली आहे.

हे देखील वाचा