पंकजा मुंडेंना उमेदवारी न दिल्याने समर्थक आक्रमक, औरंगाबादमध्ये भाजप कार्यालयाबाहेर गोंधळ

Munde supporters protest outside Aurangabad BJP office

औरंगाबाद, 9 जून : विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (BJP leader Pankaja Munde) यांना पक्षाने उमेदवारी न दिल्याने मुंडे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. औरंगाबाद (Aurangbad) येथील पंकजा मुंडे समर्थकांनी भाजप कार्यालयाबाहेर जोरदार गोंधळ (Munde supporters protest outside Aurangabad BJP office) घातला. पंकजा मुंडे यांचे समर्थक दुपारच्या सुमारास भाजप कार्यालयात घुसून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली.

पंकजा मुंडे समर्थकांनी भाजप कार्यालयाबाहेर एकत्र येत घोषणाबाजी करत गोंधळ घातला. तसेच पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.

यावेळी पोलिसांनी तात्काळ या आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना वेळीच ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेलं आहे.

आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. तर भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी करत गोंधळ घातला.

पंकजा मुंडे नॉट रिचेबल

मिळालेल्या माहितीनुसार, कालपासून पंकजा मुंडे नॅाट रिचेबल आहेत. कालपासून आपण त्यांच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत. दोन दिवस पंकजा मुंडे बोलणार नाहीत अशी माहिती पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडेंना डावललं

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची यादी बुधवारी (8 जून) जाहीर (BJP candidates list announced for MLC Election) केली आहे. या यादीत एकूण पाच उमेदवारांची नावे आहेत.

भाजपकडून विधानपरिषदेत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना उमेदवारी दिली जाणार अशी जोरदार चर्चा होती. पण भाजपने जाहीर केलेल्या यादीत पंकजा मुंडे यांच्या नावांचा समावेश नव्हता.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं, भाजपचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरकेर, माजी मंत्री राम शिंदे, भाजप महाराष्ट्राचे संघटन सचिव श्रीकांत भारतीय, भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे, राज्य भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड अशी नावे केंद्र भाजपने घोषित केले आहेत.

आमच्या पार्टीत आम्ही सर्व जण कोऱ्या पाकीटासारखे असतो. जो पत्ता लिहिल तिकडे जात असतो. राजकीय कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी इच्छा व्यक्त करायची असते पण निर्णय शेवटी संघटना करते.

लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषदेच्या उमेदवारांचा निर्णय केंद्रातून होतो. पंकजा ताईंच्या उमेदवारीसाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासह आम्ही सर्वांनीच प्रयत्न केले पण केंद्राने काही भविष्यातला विचार केला असेल असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी पुढे म्हटलं, पंकजा ताई या ऑलरेडी ऑल इंडिया सेक्रेटरी आहेत. मध्यप्रदेशच्या सहप्रभारी आहेत. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र नंतर मध्यप्रदेश हे मोठं राज्य आहे आणि त्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.