बीड : बनावट लग्न करून फसवणारी नवरी अखेर पोलिसांच्या ताब्यात

Filed a case against a young man for raping a young woman under the pretext of marriage

गेवराई : बीड जिल्ह्यातील तळणेवाडी येथील एका युवकाला बनावट लग्न करून त्यांची फसवणूक केल्या प्रकरणी गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.

यातील मुख्य सुत्रधाराला व बनावट मामा असणाऱ्यांना यापूर्वीच अटक केल्यानंतर यातील नवरी व तिच्या आईला आज (दि.२६) मंगळवारी गेवराई पोलिसांनी औरंगाबाद येथून ताब्यात घेतले आहे.

नवरी रेखा बाळू चौधरी व तिची आई सुनिता चौधरी दोघी राहणार जाधववाडी सिडको औरंगाबाद असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचीं नावे आहेत.

तालुक्यातील तळणेवाडी येथील बनावट लग्न लाऊन दोन लाखांला गंडा घातल्या प्रकरणात नववधू तिचे नातेवाईक अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणातील मुख्य सुत्रधार रामकिशन जगन्नाथ तापडीया रा.सालवडगावं ता.शेवगावं जिल्हा अहमदनगर व नवरी मुलीचा मामा म्हणून मिरवणारा विठ्ठल किशनराव पवार राहणार औरंगाबाद यांना आधी अटक करण्यात आली होती.

आता नवरी रेखा बाळु चौधरी राहणार जाधववाडी औरंगाबाद सिडको हि गेवराई पोलिसांनी जाधववाडी सिडको औरंगाबाद येथून ताब्यात घेतले आहे.